चैतन्य योग निसर्गोपचार केंद्र उद्घाटन सोहळा दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला
Tue, 17 Sep 2024
112 Views

"

चैतन्य योग निसर्गोपचार केंद्र उद्घाटन सोहळा दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. सोहळ्यामध्ये माननीय श्री सुरेश भाऊ खाडे ( कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा तसेच

सुविद्या पत्नी सौ सुमन ताई खाडे व BSL कंपनीचे अध्यक्ष श्री विजय जगदाळे सर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला
चैतन्य योग निसर्गोपचार केंद्र चालू करण्याचे कारण म्हणजे धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये योग ,आयुर्वेद , च्या माध्यमातून व्यक्ती शारीरिक मानसिक ,बौद्धिक, गुणाने सक्षम व्हावा आरोग्य चांगले राहावे आणि वाढता अनावश्यक गोळ्यांचा शरीरावरती होणारा साईड इफेक्ट लक्षात घेता ऑरगॅनिक आयुर्वेदिक पद्धतीने उपचार पद्धती सुविधा उपलब्ध केलेले आहे 

आठवड्यातून दर सोमवारी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर राहणार असून शिबिरामध्ये जापनीज मशीनच्या द्वारे पूर्ण बॉडी चेकअप आणि डिसीज द्वारे आजार -व्याधी- रोगाचे निदान समजून घेऊन त्यावरती उपचार पद्धती असून हजारो आज लोक हे सर्व उपचार च्या माध्यमातून बरे होत आहेत.
चला तर मग वेळ का करता आजच चैतन्य योग निसर्गोपचार ला भेट द्या. CEO डॉक्टर चेतन कलकुटगी (BAMS AM, CMS & ED)

Reporter Chetan

 
Home
About
Blog
Contact
FAQ